राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची होणार तपासणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा


राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची होणार तपासणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींची येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांकडून सखोल तपासणी करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
या निर्णयाअंतर्गत विशेषतः नाशिक जिल्ह्यातील मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे अभिलेख, मालकी हक्क आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत पोलीस विभाग तसेच आयजीआर (नोंदणी महानिरीक्षक) कार्यालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश असेल.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून मिळविण्यात आलेल्या किंवा अनधिकृत आढळणाऱ्या खाजगी जमिनींबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवून त्या शासनाच्या ताब्यात घेण्याबाबत विचार केला जाईल.
या निर्णयामुळे राज्यातील मिशनरी संस्थांच्या ताब्यातील जमिनींच्या वापर, मालकी हक्क आणि कायदेशीर स्थितीबाबत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तपासणी अहवालानंतर पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत सरकारने दिले आहेत.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो.: ९८२२५४८४२९


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!