पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली; १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी


:पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली; १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ दोन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच इतर बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर संयुक्त बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखालून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात काही प्रमाणात अडथळे निर्माण होत असले तरी बचाव पथके जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत. जखमींची संख्या आणि दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी मो. : 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!