डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण प्रकरण; शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक


डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण प्रकरण; शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक

डोंबिवली | प्रतिनिधी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली.
माहितीनुसार, एका महिला रुग्णाच्या उपचाराच्या कारणावरून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या चार समर्थकांनी रुग्णालयातील दोन डॉक्टर तसेच परिचारिकांना मारहाण केली. यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे संपूर्ण दृश्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या प्रकरणी डॉक्टर वैभव साळुंखे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केली.
या घटनेमुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, डॉक्टर संघटनांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. : ९८२२५४८४२९


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!