मुसळधार पावसात नागरिकांना दिलासा; नगरसेवक अमित गावडे यांच्या तत्परतेने रस्त्यावर कोसळलेले झाड हटवले
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमेश्वर उद्यान, सेक्टर २५ समोरील बेलाचे झाड अचानक भिंतीवर कोसळल्याने परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या पुढाकाराने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले झाड त्वरित हटवून वाहतूक सुरळीत केली.
वेळेत करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे मोठा अपघात टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. नागरिकांच्या अडचणींना तातडीने प्रतिसाद देत रस्ता पूर्ववत सुरू करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरसेवक अमित गावडे व अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.
प्रतिनिधी अभिजित कुलकर्णी पुणे






