ठाणे न्यायालय गेट क्रमांक ३ जवळ धोकादायक झाड; तातडीने कारवाईची मागणी
ठाणे | प्रतिनिधी
ठाणे न्यायालयाच्या गेट क्रमांक ३ जवळील एक मोठे झाड धोकादायकरीत्या झुकले असून ते कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या परिसरात दररोज वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा परिस्थितीत झाड कोसळल्यास जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
यामुळे संबंधित नागरिक आणि वकिलांकडून ठाणे महानगरपालिका (TMC) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांनी या झाडाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी झाडाची छाटणी किंवा आवश्यक असल्यास ते सुरक्षितरीत्या हटविण्याची मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया







