खाकी वर्दीतील माणुसकी! डीसीपी डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या तत्परतेने फिट आलेल्या वारकऱ्याचे प्राण वाचले
पुणे | प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माउली यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असताना नाना पेठ आणि भवानी पेठ परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला होता. याच दरम्यान पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या एका वारकऱ्याला फिट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. मात्र, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आणि त्याचे प्राण वाचवले.
बंदोबस्तावर असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेत वारकऱ्याला आवश्यक उपचार मिळतील याची व्यवस्था केली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संबंधित वारकऱ्याची प्रकृती स्थिर झाली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
या घटनेतून डॉ. भाजीभाकरे यांची कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि माणुसकी अधोरेखित झाली असून, त्यांच्या या तत्पर कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पालखी सोहळ्यात पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीतही दाखवलेली तत्परता या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाली
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






