मोशी कचरा डेपो दुर्घटना; २५ तासांनंतरही बचावकार्य सुरू, आठ जण अडकल्याची भीती:-


मोशी कचरा डेपो दुर्घटना; २५ तासांनंतरही बचावकार्य सुरू, आठ जण अडकल्याची भीती:-

जि. पुणे.(पिंपरी-चिंचवड):दी. 9 जुलै :-पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर तब्बल २५ तास उलटूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ढिगाऱ्यातून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आणखी आठ जण कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, महापालिका प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे बचाव मोहीम हाती घेतली आहे. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा आणि खचलेल्या इमारतीचा काही भाग अडकलेल्या नागरिकांवर कोसळण्याचा धोका असल्याने अत्यंत सावधगिरीने शोधकार्य सुरू आहे.

यंत्रसामग्रीचा वापर मर्यादित ठेवण्यात आला असून, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी एनडीआरएफचे जवान हाताने कचरा हटवत शोधमोहीम राबवत आहेत. अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अखंडपणे सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!