नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये ‘हनिमून कोच’ सजावट महागात; टीटीई निलंबित, डेकोरेटरवर गुन्हा


नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये ‘हनिमून कोच’ सजावट महागात; टीटीई निलंबित, डेकोरेटरवर गुन्हा

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्यात एका जोडप्याने खाजगी डेकोरेटरच्या मदतीने कूपेची ‘हनिमून सूट’प्रमाणे सजावट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जालना ते मुंबई प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, संबंधित जोडप्याने फर्स्ट एसी कूपेमध्ये फुगे, फुले आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून विशेष सजावट करून घेतली होती. मात्र, रेल्वेच्या परवानगीशिवाय धावत्या रेल्वेत अशा प्रकारे सजावट करण्यात आल्याने सुरक्षा नियमांचा आणि रेल्वेच्या नियमांचा भंग झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेने कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून संबंधित टीटीईला तत्काळ निलंबित केले आहे. तसेच, रेल्वेचे तिकीट न घेता अनधिकृतपणे ट्रेनमध्ये प्रवेश करून सजावट केल्याप्रकरणी संबंधित खाजगी डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!