आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर सायकल वारीला हिरवा झेंडा; शेकडो सायकलिस्ट वारकरी पंढरपूरकडे रवाना:-


आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर सायकल वारीला हिरवा झेंडा; शेकडो सायकलिस्ट वारकरी पंढरपूरकडे रवाना:-

जि. सातारा, ता.कोरेगाव :दी.11 जुलै :-कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर सायकल वारीला शनिवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल वारीला शुभारंभ करण्यात आला.

सरस्वती विद्यालय, कोरेगाव येथून सुरू झालेल्या या सायकल वारीत सुमारे १०० ते १५० सायकलिस्ट वारकरी सहभागी झाले. विठ्ठल नामाचा गजर, भक्तिमय वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित सायकलिस्ट वारकऱ्यांना शुभेच्छा देत सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भक्ती, फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशनचे पदाधिकारी, वारकरी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सर्व सायकलिस्ट वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने उत्साहात रवाना झाले.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!