नाशिक–निफाडदरम्यान ऑप्टिकल फायबर केबल कट; BSNL ब्रॉडबँड सेवा विस्कळीत:-
जि. नाशिक, ता. निफाड :दी. 10 जुलै :-नाशिक ते निफाड दरम्यान ऑप्टिकल फायबर (OFC) केबल कट झाल्यामुळे BSNL ची बॅकबोन इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी, निफाड परिसरातील अनेक BSNL ब्रॉडबँड व फायबर इंटरनेट ग्राहकांना सेवा खंडित होण्याचा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑप्टिकल फायबर केबलमध्ये बिघाड झाल्याने इंटरनेट सेवा प्रभावित झाली असून, संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथक प्रयत्नशील असून, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट सेवा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, SCN Networks Niphad (साई केबल नेटवर्क ) आणि संबंधित विभागाने ग्राहकांना संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
P9359280220.





