सोलापूर हादरले! तडवळ स्थानकावर उभ्या यशवंतपूर–बीकानेर एक्स्प्रेसमध्ये थरारक दरोडा; प्रवाशांना मारहाण, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटले


सोलापूर हादरले! तडवळ स्थानकावर उभ्या यशवंतपूर–बीकानेर एक्स्प्रेसमध्ये थरारक दरोडा; प्रवाशांना मारहाण, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटले

सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील तडवळ रेल्वे स्थानकावर पहाटेच्या सुमारास उभी असलेल्या यशवंतपूर–बीकानेर एक्स्प्रेसमध्ये थरारक दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांना बेदम मारहाण केली. महिला प्रवाशांनाही त्यांनी सोडले नाही. मारहाण करत प्रवाशांकडील मोबाईल फोन, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!