पुणे: कोंढव्यातील प्रसिद्ध इराणी टी कॅफेवर एफडीएची कारवाई; परवाना निलंबित
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील कोंढवा (खुर्द) येथील एनआयबीएम (NIBM) रोडवरील प्रसिद्ध इराणी टी कॅफेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने कॅफेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर एफडीएच्या पथकाने कॅफेमध्ये अचानक तपासणी केली. यावेळी मुदतबाह्य दूध व इतर काही खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर संबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कॅफेचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429





