डॉ. अनिल पावसे यांना ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान


डॉ. अनिल पावसे यांना ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवड :
शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक तसेच संस्कारक्षम कार्याबद्दल उल्हासनगर येथील हनुमान व्यवस्थापक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉ. अनिल गणपत पावसे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुपच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
देशभरातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट, मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या निवडक शिक्षणतज्ज्ञांचा या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार शंकरराव जगताप तसेच स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश साबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ. पावसे यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ. अनिल पावसे यांनी गेली अनेक दशके शिक्षण क्षेत्राबरोबरच समाजसेवा, साहित्य, संस्कृती, योग, पर्यावरण जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय व बहुआयामी योगदानाची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पावसे यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!