मोशी कचरा डेपो दुर्घटना: ९ कामगारांचा मृत्यू; पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
पिंपरी-चिंचवड:
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे ८१ तास चाललेल्या बचावकार्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. या काळात १४ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
या गंभीर घटनेची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभाग तसेच कंत्राटदार कंपनी ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याशिवाय, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास सुरू असून, जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मोशी कचरा डेपोतील या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. :::
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







