कळवणचे सुपुत्र डॉ. किशोर देशपांडे यांची ‘महामंडलेश्वर’ पदी राष्ट्रीय स्तरावर निवड; गुरुपौर्णिमेला होणार पट्टाभिषेक


​कळवणचे सुपुत्र डॉ. किशोर देशपांडे यांची ‘महामंडलेश्वर’ पदी राष्ट्रीय स्तरावर निवड; गुरुपौर्णिमेला होणार पट्टाभिषेक

​कळवण / नाशिक:
अध्यात्म, ज्योतिष आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कळवण (जि. नाशिक) येथील सुपुत्र आचार्य डॉ. किशोर नलिनी रमेश देशपांडे यांना राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा आध्यात्मिक सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांची राष्ट्रीय स्तरावर ‘महामंडलेश्वर’ पदी गौरवपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, दि. १२ जुलै २०२६ (ज्येष्ठ कृष्ण प्रदोष शिवरात्री पर्वकाळ) रोजी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली.
​श्री पंचदशनाम गुरुदत्त आखाड्याकडून बहुमान
महाराष्ट्रभरातून डॉ. किशोर देशपांडे यांची या सर्वोच्च पदासाठी निवड करण्यात आली आहे. ‘श्री पंचदशनाम गुरुदत्त आखाडा’ (रजि. क्र. १०६, भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष व कोषाध्यक्ष श्री अनिरुद्धजी महाराज यांच्या वतीने डॉ. देशपांडे यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
​या ऐतिहासिक बहुमानाचा ‘महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळा’ आगामी आषाढी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे अत्यंत भव्य आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून नामवंत संत-महंत, विविध आखाड्यांचे पदाधिकारी, धर्मगुरू आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
​अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि बहुआयामी कार्य
​डॉ. किशोर देशपांडे यांनी धर्म, अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्र या विषयात ‘पीएचडी’ (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. अध्यात्मिक क्षेत्रासोबतच त्यांचे सामाजिक आणि संघटन कार्यही मोठे आहे. ते सध्या खालील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत:
​भारतीय पत्रकार संघ: राष्ट्रीय समन्वयक
​अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ: उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व नाशिक ग्रामीण कार्याध्यक्ष
​श्री कुल पीठ काशी: धर्म व अध्यात्म जनसंपर्क प्रकोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष
​हिंदू एकता निर्माण संघ: महाराष्ट्र उपाध्यक्ष
​इतर संघटना: भारतीय किसान संघ आणि भारतीय जनता पार्टी अध्यात्म आघाडीमध्ये सक्रिय सहभाग.
​याशिवाय, लोकसहभागातून गावागावांत पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, गो-सेवा, अध्यात्म पत्रकारिता, कृषी, आयुर्वेद आणि समाज प्रबोधन या क्षेत्रांतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांची सर्वत्र ओळख आहे.
​शुभेच्छांचा वर्षाव
“हा राष्ट्रीय सन्मान आई-वडिलांचे आशीर्वाद आणि थोर संत-महंत व गुरुजनांच्या कृपाशीर्वादामुळेच प्राप्त झाला आहे,” अशी भावना डॉ. किशोर देशपांडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार, विविध सामाजिक व राजकीय संघटना आणि नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी.
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!