​अविनाश कुलकर्णी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड ‘ज्येष्ठ नागरिक सेल’च्या अध्यक्षपदी निवड


​अविनाश कुलकर्णी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड ‘ज्येष्ठ नागरिक सेल’च्या अध्यक्षपदी निवड

​पिंपरी-चिंचवड:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) ‘ज्येष्ठ नागरिक सेल’च्या अध्यक्षपदी श्री. अविनाश पांडुरंग कुलकर्णी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व माजी महापौर श्री. योगेश मंगलसेन बहल यांनी त्यांना नुकतेच हे नियुक्ती पत्र प्रदान केले.
​श्री. अविनाश कुलकर्णी यांच्याकडे पक्षाची आणि संघटनेची जबाबदारी सोपवताना शहराध्यक्ष योगेश बहल यांनी विश्वास व्यक्त केला की, ते पक्ष संघटना अधिक मजबूत करतील. तसेच पक्षाचे विचार आणि ध्येय-धोरणे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करतील.
​अजितदादा गटातील पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या विशेष नियुक्ती सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सेलचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत श्री. कुलकर्णी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
​पक्षाच्या ध्येय-धोरणांचा करणार प्रचार
या नियुक्तीनंतर श्री. अविनाश कुलकर्णी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजितदादा पवार, राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनील तटकरे साहेब यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
​त्यांच्या या निवडीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!