सासवड -जेजुरी मार्गांवर वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात : सांगली येथील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू :-


सासवड -जेजुरी मार्गांवर वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात : सांगली येथील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू :-

सांगली :दी. 13 जुलै :-सासवड–जेजुरी मार्गावर बेलसर टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीच्या ट्रकची धडक सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकऱ्यांना बसली.

या दुर्घटनेत सात महिला वारकरी जखमी झाल्या असून त्यापैकी तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातामुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरनिवर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!