मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई
अँटोनी लारा कंपनीवर गुन्हा; आरोपींना अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पिंपरी, दि. १४ जुलै : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत दुर्घटनेस जबाबदार धरलेल्या अँटोनी लारा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा डोंगर कोसळून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर ढिगारा पडल्याने कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेनंतर निष्काळजीपणाबाबत चौकशी सुरू होती.
तपासादरम्यान निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अँटोनी लारा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे मोशी दुर्घटना प्रकरणातील जबाबदारांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे





