संत सेना महाराज मंदिर महिला मंडळाकडून पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटप


संत सेना महाराज मंदिर महिला मंडळाकडून पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटप

भोसरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भोसरी येथील श्री संत सेना महाराज मंदिर महिला मंडळाच्या वतीने पालखी मार्गावर वारकरी महिला व भाविकांसाठी फराळ, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्नेहा ताई निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला.

महिला मंडळाचा हा उपक्रम दरवर्षी राबविला जात असून, समाजातील अनेक महिला मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. वारकरी संप्रदायाच्या सेवेला वाहिलेला हा उपक्रम भाविकांकडून कौतुकास पात्र ठरला.

यावेळी उपाध्यक्षा सौ. मोहिनीताई आशिष उरकूटकर, भारतीताई रसाळ, सौ. पुष्पाताई भालेकर, सौ. मंदाताई घायतडक, सौ. छायाताई जाधव, सौ. आशाताई शेळके, चंद्रभागा गायकवाड, सौ. उज्वलाताई रसाळ, सौ. भारतीताई सांगळे, सौ. लक्ष्मीताई गायकवाड, सौ. प्रमिलाताई भालेकर, सौ. प्रमिलाताई कोळेकर, सौ. वर्षाताई पाटील, सौ. भारतीताई वखरे, सौ. अश्विनीताई नावकर, सौ. उषाताई भटकर, सौ. पुनम ताई कोळपकर, सौ. पूनम ताई बिडवे आणि सौ. बालिका बिरादार यांच्यासह महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सेवाकार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी महिलांनी वारकऱ्यांना बिस्किटे व फराळाचे वाटप करत वारीचा आनंद लुटला. फुगड्या खेळत, “ज्ञानोबा-तुकोबा” नामाचा गजर करत आणि भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सेवाभाव, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!