दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल २९.५३ टक्के, नाशिक विभाग राज्यात अव्वल


दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल २९.५३ टक्के, नाशिक विभाग राज्यात अव्वल

मुंबई :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावीच्या जून-जुलै २०२६ पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल २९.५३ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या ३६.४८ टक्क्यांच्या तुलनेत यामध्ये ६.९६ टक्क्यांची घट झाली आहे.
यंदाच्या पुरवणी परीक्षेसाठी एकूण ५३,८८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ३७,९२४ मुले आणि १४,९५६ मुली यांचा समावेश होता. प्रत्यक्षात ५१,३१३ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, त्यापैकी १५,१५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकालात नाशिक विभागाने ४१.४५ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ३४.२७ टक्के लागला आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक राहिली आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी १५ जुलै ते २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!