पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात पुरला, ११ महिन्यांनी गुन्ह्याचा उलगडा
नवी मुंबई :
नवी मुंबईतील ऐरोली आणि दिघा परिसरात गेल्या वर्षी घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तब्बल ११ महिन्यांनंतर यशस्वी उलगडा केला आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मृतदेहाचे तीन तुकडे करून ते जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी पुरल्याचे तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, चौकशी आणि तपासाच्या आधारे आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, या हत्येमागील संपूर्ण कट आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.
या निर्घृण हत्याकांडामुळे नवी मुंबई परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429








