पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; कोथरूडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला


पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; कोथरूडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळाला असून, कोथरूड परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
​मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोथरूड भागात ही घटना घडली. अमित शिंदे असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमित कोथरूडमधील एका मोबाईल दुकानात काम करतो. तो दुकानाबाहेर उभा असताना अचानक आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
​हा भीषण हल्ला भररस्त्यात झाला असून, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!