अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. – राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या अधिकृत यादीत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार, दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवार यांच्या कार्याला शासकीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली असून, त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक सर्व संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ, पुणे








