पिंपरी-चिंचवडमध्ये २१ जुलै रोजी भव्य ‘डाक महामेळावा २०२६’ व आधार सेवा शिबिर


पिंपरी-चिंचवडमध्ये २१ जुलै रोजी भव्य ‘डाक महामेळावा २०२६’ व आधार सेवा शिबिर

पिंपरी-चिंचवड : भारतीय डाक विभाग आणि नगरसेवक विश्वजीत बारणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड येथे ‘डाक महामेळावा २०२६’ आणि आधार सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक निलेशदादा हिरामण बारणे आणि युवासेना सचिव (पश्चिम महाराष्ट्र) विश्वजीतदादा श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा मेळावा सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत मोरया बँक्वेट हॉल येथे होणार असून नागरिकांना विविध शासकीय व आर्थिक सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
शिबिरामध्ये सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलींसाठी आकर्षक ८.२ टक्के व्याजदरासह खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध असेल. किमान २५० रुपयांपासून खाते सुरू करता येणार आहे.
याशिवाय आधार सेवा केंद्रात नवीन आधार नोंदणी, बायोमेट्रिक अद्ययावत करणे तसेच नाव, पत्ता आणि इतर माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत केवळ १०० रुपयांत डिजिटल बचत खाते उघडता येणार असून, हे खाते विविध शासकीय योजनांच्या थेट लाभ हस्तांतरणासाठी (DBT) उपयुक्त ठरणार आहे.
तसेच नागरिकांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण मिळविण्याची संधीही या मेळाव्यात उपलब्ध होणार आहे.
या जनहिताच्या उपक्रमाचा पिंपरी-चिंचवड परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!