राजकारणात मोठा भूकंप! प्रा. लक्ष्मण हाके यांच्याकडून ‘ओबीसी जनता पार्टी’ची घोषणा
बारामती: ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ‘ओबीसी जनता पार्टी’ या नव्या पक्षाची अधिकृत स्थापना जाहीर केली.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. हाके यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात ६० टक्के ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्यांना कोणत्याही प्रमुख पक्षाने प्राधान्य दिले नसल्याचेही ते म्हणाले.
नव्या **’ओबीसी जनता पार्टी’**च्या माध्यमातून ओबीसी, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढा दिला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांवरही टीका करत, प्रस्थापित राजकारणाला पर्याय उभा करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.
या नव्या पक्षाच्या घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548129





