फिफा विश्वचषक २०२६: अर्जेंटिनावर मात करत स्पेन दुसऱ्यांदा विश्वविजेता
नवी दिल्ली : फिफा विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा अतिरिक्त वेळेत पराभव करत इतिहासातील दुसरे विश्वविजेतेपद पटकावले. २०१० नंतर स्पेनने पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले.
निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेतील १०६व्या मिनिटाला स्पेनच्या फेरान टोरेसने निर्णायक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. हा गोल अखेरपर्यंत कायम राहिल्याने स्पेनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
गतविजेता अर्जेंटिनाने अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले, मात्र स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांना यश मिळाले नाही. या पराभवामुळे अर्जेंटिनाचे सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
स्पेनच्या या ऐतिहासिक विजयाचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. चाहत्यांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केला. स्पेनच्या फुटबॉल इतिहासातील हा आणखी एक सुवर्णक्षण मानला जात असून संघाच्या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429





