पुणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांची देवदूत ठरलेली तत्परता; प्रसूती कळांनी विव्हळलेल्या मातेचे प्राण वाचवले


पुणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांची देवदूत ठरलेली तत्परता; प्रसूती कळांनी विव्हळलेल्या मातेचे प्राण वाचवले

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रसूती वेदनांनी विव्हळलेल्या एका महिलेला रेल्वे पोलिसांनी वेळेत मदत करून ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मातेचे प्राण वाचले.
माहितीनुसार, स्टेशन परिसरात महिला प्रसूती कळांनी विव्हळत असल्याची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले पीएसआय कांबळे आणि एसआय इनामदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणताही विलंब न करता त्यांनी महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात महिलेची यशस्वी प्रसूती झाली. मात्र, दिवस पूर्ण भरले नसल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरीही पोलिसांच्या तत्परतेमुळे मातेचे प्राण वाचले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पीएसआय कांबळे आणि एसआय इनामदार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!