मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान जमावबंदी; ५ किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
मुंबई : मुंबईत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, २३ जुलै ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरातील शांतता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत विनापरवानगी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास मनाई असेल.
पोलिसांनी नागरिकांना आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429







