संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा


संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ६० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई;
तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा

कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके आणि एका कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रागिणी खडके यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
तपासात देवस्थानच्या निधीतून ५५ लाख रुपयांचा धनादेश कथितपणे बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचा तसेच दोन जमीन खरेदी व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पोलीस तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सखोल चौकशी सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!