यवतमाळमध्ये शाळेत गोंधळ; मुख्याध्यापिकांवर झोपल्याचा, पतीवर अरेरावीचा आरोप,


यवतमाळमध्ये शाळेत गोंधळ; मुख्याध्यापिकांवर झोपल्याचा, पतीवर अरेरावीचा आरोप,

ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका आपल्या कक्षात झोपल्याचा, तर त्यांचे पती मद्यधुंद अवस्थेत शाळेत बसून पालकांशी अरेरावी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ आणि पालकांनी केला आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून संबंधित मुख्याध्यापिकेची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थितीच्या आधारे संबंधितांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!