अकोल्यात बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; ९७ हजारांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक


अकोल्यात बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; ९७ हजारांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक

अकोला : अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बनावट नोटा छापून बाजारात चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या १९४ बनावट नोटा, एकूण ९७ हजार रुपयांचे बनावट चलन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुडधी आणि मूर्तिजापूर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून बनावट नोटांसह इतर साहित्यही जप्त करण्यात आले असून, त्याची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटा तयार करण्यामागील सूत्रधार कोण, या रॅकेटचे इतर सदस्य कोण आहेत आणि या नोटा राज्यातील इतर भागातही चलनात आणल्या गेल्या आहेत का, याचा सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना व्यवहार करताना चलनी नोटांची काळजीपूर्वक पडताळणी करण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद नोटा किंवा अशा प्रकारची माहिती आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!