ठाण्यातील लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल


ठाण्यातील लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील महाराजा लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 जुलै 2026 रोजी दुपारी 3:20 ते रात्री 10:50 या कालावधीत घडली. मृत तरुणीची ओळख संध्या राजेश म्हस्के (वय 23, रा. भांडुप पूर्व) अशी झाली आहे.
या प्रकरणी नंदकिशोर संजय गाडेकर (वय 27, रा. अण्णा नगर, डोंबिवली पश्चिम) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीची भूमिका आणि मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत.
पोलीस अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!