कोल्हापुरात उभारले जाणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; KDCA आणि क्रीडा विभागात सामंजस्य करार


कोल्हापुरात उभारले जाणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; KDCA आणि क्रीडा विभागात सामंजस्य करार

कोल्हापूर : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, कोल्हापुरात ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) आणि महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागादरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार पार पडला.
स्टेडियम उभारणीसाठी करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील ३१.९० एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. हे स्टेडियम बीसीसीआय (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्या मानकांनुसार विकसित केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, स्टेडियम परिसरात क्रिकेटच्या इतिहासाची माहिती देणारे आधुनिक क्रिकेट संग्रहालयही उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील क्रीडा पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!