जेनेरिक औषधांच्या आयातीवर ट्रम्प यांची मोठी घोषणा; २०२९ पासून २००% टॅरिफ लागू होणार
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांबाबत मोठी घोषणा केली आहे. नव्या धोरणानुसार, १ ऑगस्ट २०२८ पर्यंत आयातीत जेनेरिक औषधांवर कोणतेही आयात शुल्क (टॅरिफ) आकारले जाणार नाही.
यानंतर १ ऑगस्ट २०२८ ते ३१ जुलै २०२९ या कालावधीत आयातीत जेनेरिक औषधांवर १०० टक्के टॅरिफ लागू करण्यात येईल. तसेच १ ऑगस्ट २०२९ पासून हा टॅरिफ २०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.
या निर्णयामागील उद्देश अमेरिकेतच औषधांचे उत्पादन वाढवणे, परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि औषध उत्पादक कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन केंद्रे उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे हा असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निर्णयाचा भारतासह जेनेरिक औषधांची निर्यात करणाऱ्या देशांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, अमेरिकेतील औषधांच्या किमती वाढण्याबाबतही औषध उद्योगातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








