आमचा वेळ वाया घालवू नका’; CJP आंदोलनकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची तातडीच्या सुनावणीस नकार


आमचा वेळ वाया घालवू नका’; CJP आंदोलनकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची तातडीच्या सुनावणीस नकार

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या संसद मार्चदरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हे प्रकरण मांडण्यात आले. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करण्याची विनंती केली. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, “आमचा आणि तुमचा स्वतःचाही वेळ वाया घालवू नका,” अशी टिप्पणी करत तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळून लावली. तसेच, “आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संसद मार्चदरम्यान झालेल्या पोलिस कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे देशभरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!