भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना


भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सार्थक पाटील असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने खेळत असलेल्या सार्थकवर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी त्याची दिव्यांग आई जवळच होती; मात्र तिच्या दिव्यांगत्वामुळे मुलाचा आक्रोश तिला ऐकू न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासनानेही या घटनेची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!