पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना; विद्यार्थी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया


पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना; विद्यार्थी आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली :NEET पेपरफुटीप्रकरणी देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत त्यांनी पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना जलद आणि कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
“देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना तातडीने कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील. संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या घोषणेनंतरही आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवत दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!