दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनाचे मुंबईत पडसाद; शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचे आंदोलन


दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनाचे मुंबईत पडसाद; शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबई :दिल्लीतील NEET पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आंदोलकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
शिवाजी पार्क परिसरात आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरफुटीप्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागल्याचे या आंदोलनातून दिसून आले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!