ठाणे : ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ काही वेळापूर्वी काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला. या अपघातामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांची संथ गतीने ये-जा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक विभाग आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई
Views: 60




