पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा; भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे मागणी


पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा; भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे मागणी

​पिंपरी-चिंचवड:सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीची चौकशी करून तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले असून, याची प्रत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.
​सोशल मीडियावर एक व्हिडिओ (फेसबुक रील) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली असून, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे.
​पंतप्रधान हे देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर कार्यरत आहेत. अशा पदावरील व्यक्तीविरुद्ध सोशल मीडियावर धमकी देणारे किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे वक्तव्य करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
​याप्रकरणी संबंधित व्हिडिओची सत्यता, तो प्रसारित करणारी व्यक्ती आणि त्यामागील उद्देश याची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीदरम्यान दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

​प्रतिनिधी : विजय अडसूळ


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!