राष्ट्रकुल स्पर्धा २०२६: पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारने भारताला मिळवून दिले पहिले पदक; कांस्यपदकावर नाव कोरले
ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये भारताने अखेर पदकांचे खाते उघडले असून भारतीय पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारने पुरुषांच्या हेवीवेट गटात दमदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.
२९ वर्षीय झंडू कुमारने १३०.९ गुणांची नोंद करत तिसरे स्थान पटकावले. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात १९० किलो वजन यशस्वीरीत्या उचलून प्रभावी कामगिरी केली.
या स्पर्धेत नायजेरियाच्या रिलुवन इद्रिसने १३२.८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर इंग्लंडच्या मॅथ्यू हार्डिंगने १३१.० गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला.
झंडू कुमारच्या या ऐतिहासिक यशामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदक मोहिमेची शानदार सुरुवात झाली असून देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





