नीट पेपरफुटी प्रकरण: जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत पोलीस कॉन्स्टेबलच्या ‘राजीनाम्याचा’ व्हिडिओ व्हायरल; उत्तराखंड पोलिसांचे स्पष्टीकरण


नीट पेपरफुटी प्रकरण: जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत पोलीस कॉन्स्टेबलच्या ‘राजीनाम्याचा’ व्हिडिओ व्हायरल; उत्तराखंड पोलिसांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली / पिथौरागढ :
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक पोलीस कॉन्स्टेबल गणवेशात मंचावर येऊन नोकरीचा राजीनामा देत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
‘सीजीपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाई आणि लाठीमाराच्या निषेधार्थ अनेक संघटना व नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. याच दरम्यान शेर सिंग नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलने आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपण पोलीस सेवेतून राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याचा व्हिडिओ समोर आला.
मात्र, या व्हिडिओनंतर उत्तराखंड पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेर सिंग हे उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे कार्यरत होते. ते २८ जूनपासून विनापरवानगी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात आली असून, २० जुलै रोजी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
यामुळे आंदोलनस्थळी करण्यात आलेल्या “राजीनाम्याच्या” घोषणेपेक्षा त्यांच्यावर आधीच निलंबनाची कारवाई झाल्याचे उत्तराखंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या असून, व्हायरल व्हिडिओ आणि अधिकृत स्पष्टीकरण यामुळे या घटनेला नवे वळण मिळाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!