तेलंगणातून महाराष्ट्रात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; लातूर LCBची मोठी कारवाई, ₹४०.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
तेलंगणातून महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या होणाऱ्या गुटखा तस्करीचा लातूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) औसा येथे पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आयशर टेम्पोसह ₹२८ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहनासह एकूण ₹४० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आयशर टेम्पो पकडला गेला असून याप्रकरणी तेलंगणातील दोन गुटखा तस्करांना अटक करण्यात आली आहे.
सध्या औसा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429
Views: 48







