धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेस आक्रमक


धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेस आक्रमक

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इथेनॉल धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत नितीन गडकरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. इथेनॉल मिश्रित इंधन धोरणामुळे शेतकरी, ग्राहक आणि वाहनधारकांवर परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, मुंबईत आयोजित ठाकरे बंधूंच्या तिरंगा रॅलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. त्यांनी गडकरींचा उल्लेख “खड्डामंत्री” असा करत रस्त्यांच्या अवस्थेवर आणि इथेनॉल धोरणावर निशाणा साधला. आगामी काळात इथेनॉलच्या मुद्द्यावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचे संकेतही त्यांनी दिले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548129


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!