प्रधान यांचा राजीनामा १५ दिवसांपूर्वीच व्हायला हवा होता; छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर


प्रधान यांचा राजीनामा १५ दिवसांपूर्वीच व्हायला हवा होता; छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी १५ दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता, तर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संताप, आंदोलने आणि आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जसारख्या घटना टाळता आल्या असत्या, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
भुजबळ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भावना आणि जनतेचा रोष लक्षात घेऊन सरकारने योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक होते. विलंब झाल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. आता केवळ राजीनामा पुरेसा नसून विद्यार्थी, पालक आणि संबंधित घटकांशी थेट संवाद साधून त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची गरज आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत असून, छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!