इंधनातील इथेनॉल मिश्रणाविरोधात ३१ जुलैला इंडिया गेटवर ‘गाडी मोर्चा’; तहसीन पूनावाला यांची घोषणा


इंधनातील इथेनॉल मिश्रणाविरोधात ३१ जुलैला इंडिया गेटवर ‘गाडी मोर्चा’; तहसीन पूनावाला यांची घोषणा

नवी दिल्ली : इंधनातील इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाविरोधात ३१ जुलै रोजी इंडिया गेट ते संसद मार्ग असा ‘गाडी मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा राजकीय व सामाजिक विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी केली आहे. या मोर्चाचे आयोजन ‘टीम भारत’च्या माध्यमातून करण्यात येत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीप सिंग पुरी यांच्या निवासस्थानांपर्यंत मोर्चा नेण्याचा दावा करण्यात आला आहे.
पूनावाला यांनी E0 पेट्रोलच्या किमतीत कपात करावी, E20 पेट्रोलवर २० टक्के सवलत द्यावी आणि E10 वाहनधारकांसाठी बाजारात E10 पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील कथित हितसंबंधांच्या संघर्षाच्या (Conflict of Interest) आरोपांची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या मागण्यांबाबत केंद्र सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!