कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्यात आग; करजत स्थानकात प्रवाशांमध्ये घबराट


कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्यात आग; करजत स्थानकात प्रवाशांमध्ये घबराट

करजत : कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एका डब्यात अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. ट्रेन करजत स्थानकात पोहोचताच फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी घाईघाईने डब्याबाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!