वागळे इस्टेटमध्ये नाल्यात घर कोसळल्याची प्राथमिक माहिती
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक ३३ वर, डी-मार्ट मुख्य कार्यालयासमोरील एएस कार वॉशिंग सेंटरजवळ एक घर नाल्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. सध्या बचावकार्याबाबत तसेच जीवित किंवा वित्तहानीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 37




