शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत; रोहित पवारांची स्पष्ट भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “शरद पवार कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अलीकडेच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, ही भेट कोणत्याही राजकीय आघाडीसाठी नसून जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या, युवा वर्गावर होणारा अन्याय आणि त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घेण्यात आल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएत जाणार नसून विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहील. आपण स्वतः तसेच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार विरोधात राहून लढण्यास पूर्णपणे तयार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
– उमेश कुलकर्णी
9822548429




