महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना; मुसळधार पावसामुळे केळघर घाट वाहतुकीसाठी बंद


महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना; मुसळधार पावसामुळे केळघर घाट वाहतुकीसाठी बंद

महाबळेश्वर :महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरडी कोसळण्याचा वाढलेला धोका लक्षात घेऊन प्रशासनाने केळघर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या जोरदार पावसामुळे घाट परिसरातील माती सैल झाली असून, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे घाटातील रस्ता धोकादायक बनला असून, नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि स्थानिक प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या घाट परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, हवामान आणि रस्त्यांची स्थिती सामान्य झाल्यानंतरच केळघर घाट वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!